उस्मानाबाद : कळंब-DDN SF साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हावरगाव ता.कळंब येथील डी.डी.एन. एस.एफ.ए. ली. युनिट- २ साखर कारखाना व्यवस्थापन व कर्मचारी यांच्या वतीने दि. ३०आँक्टोंबर रोजी कारखाना स्थळावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच दि. ३१ रोजी कारखाना स्थळावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यांत आले होते.
आ.पाटील यांचा ४९ वा वाढदिवस असल्याने ४९ रक्तदात्यांनी रक्तदानासाठी नाव नोंदणी केली होती, परंतु कारखाना अधिकारी, कर्मचारी व कामगार यांनी रक्तदानासाठी बहुसंख्येने सहभाग नोंदवला होता. प्रत्यक्ष शिबिरात ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. सर्व रक्तदात्यांना कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने अल्पोपहार व प्रमाणपत्र देण्यात आले.
सदरील रक्तदान शिबीरास भगवंत ब्लड बँक, बार्शी यांचे प्रतिनिधी गणेश जगदाळे, प्रवीण नवले, किरण कोतमीरे, कल्याण गवळी व विजय तोडकरे यांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली तसेच सदर कार्यक्रमास कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री. दगडे, प्रोजेक्ट मॅनेजर श्री. साळुंके, चीफ इंजिनियर श्री. पतंगे, चीफ केमिस्ट श्री. सरवदे, आसवानी प्रमुख श्री. वाघमारे, पर्यावरण व्यवस्थापक व प्रशासन प्रमुख श्री. पवार, चीफ अकाउंटंट श्री. शिंदे, श्री. देशमुख, श्री. पाटील, श्री चौधरी सुरक्षा अधिकारी श्री. वरकटे, सर्व इंजिनिअर, केमिस्ट, स्टोअर किपर श्री. गुडापे व सर्व कर्मचारी कामगार उपस्थित होते.
रक्तदान शिबिरासाठी कर्मचार्यांनी स्वइच्छेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याबद्दल व शिबिराचे व्यवस्थित नियोजन केल्याबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक दिलीपदादा नाडे, मल्हारदादा पाटील, सतीश दंडनाईक व कार्यकारी संचालक विजयबापू नाडे यांनी कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी व कामगार यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.
यावर्षी पाऊस चांगला झाला असून मांजरा धरण १०० % भरले आहे व परिसरातील लहान मोठे सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे यावर्षी कारखान्यास ऊसाची कमतरता नसून पुढील किमान दोन वर्ष ऊसाची भरपूर उपलब्धता राहणार आहे. कारखाना व्यवस्थापन व अधिकारी कर्मचार्यांनी चालू हंगामासाठी कारखाना दुरुस्ती व देखाभालीची कामे अतिशय सुनियोजित पद्धतीने केलेली असून कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज आहे. यावर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करणार असून आसवानी प्रकल्पाची चाचणी घेऊन आसवानी प्रकल्प कार्यान्वित करण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा मानस आहे.