लोहा / प्रतिनिधीरस्ता सुधारणा काम अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आलेला कौडगाव ते मारतळा या तीन किमी अंतराचा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाला असून अवघ्या कांही कालावधीतच रस्त्याचे पितळ उघडे पडले आहे.लोहा तालुक्यातील सन २०१९-२० मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ता सुधारणा कामे करण्यात आले आहेत.
त्यामध्ये कौडगाव ते मारतळा या तीन किमी अंतरा दरम्यानचा रस्ता कांही दिवसांपूर्वीच पूर्ण झाला आहे. मात्र सदरील रस्ता हा बोगस झाला असून गुत्तेदारांकडून रस्ता कामात गिट्टीचा अल्प वापर, मातीमिश्रित मुरूम व डांबर कमी झाल्याने अवघ्या दोन महिन्यातच रस्ता जागोजागी उखडला आहे. सदर निकृष्ट व बोगस काम करणार्या यंत्रणेची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर सुदाम पाटील यांची स्वाक्षरी आहे.