जिल्ह्यासह तालुक्यात सुद्धा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, पण यावर्षी या उत्सवावर कोरोना चे संकट असल्याने श्रीच्या आगमनाला अवघे (एक दिवस) उरले असून, त्यापूर्वी गणेश मूर्तीच्या काम झाले आहे. यावर्षी कोरोनामूळे गणेश मूर्तीच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असून राज्य सरकारने मोठया मूर्ता बनवण्यावर बंदी घातली असून गणेश मूर्तीचे काम रंग मारून विक्री साठी करुन तयार करुन झाल्या आहे.आज बाजार पेठांमध्ये रंगाचे भाव शिगेला पोहचले असून मूर्तीकारांना या महागाईचा शुद्ध फटका बसणार आहे.
आणि या महागाईची झळ ग्राहकांना बसणार आहे. बाप्पाच्या मुर्त्या महागणार आणि बाजारात सुध्दा विकायला कमी मुर्त्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही या वर्षी २२ आगस्ट २०२० (शनिवार) रोजी बाप्पाची स्थापणा होणार असून त्या अगोदर मूर्ती बनवणारे कारागीर बाप्पाच्या मुर्त्या तयार करून सजावट करून ठेवत असतात पण कोरोनामुळे व संचार बंदीमुळे मुख्य बाजारपेठ बंद राहणार की काय यांची पण चिंता मूर्तीकारांना झाली आहे.या कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमूळे रंग आणि सजावटच्या साहित्य मिळविण्यासाठी अनेक मूर्तिकार बांधवांना अडचणींचा सामना करावा लागला होता,या एकूणच सम्पूर्ण परिस्थितीचा बाप्पाच्या उत्साहवर परिणाम होणार असल्यांची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव मर्यादित स्वरूपात साधेपणाने साजरा करावा त्यामुळे कोरोना विषाणू विरुध्द प्रशासनास मदत होईल यावर्षीचा गणपतीची मुर्ती उंची जास्तीत जास्त २ फुट किंवा ४ फुट ठेवावी गणेश मुर्ती आणण्यासाठी मोजक्या मंडळाची मुले जावे. तसेच श्री गणेश मुर्ती विसर्जन करतांना देखील मोजक्याच मंडळाच्या लोकांनी करावे.सोशल डिंस्टनस, फिजीकल डिंस्टन पाळून पुजा विधी करुन सामाजिक अंतर ठेवावे. यावर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्याची काही आवश्र्यकता नाही.आपण कोरोना संकट टळल्यावरही पुढच्या वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करु शकतो. प्रशासनाने देलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहन पोलीस निरिक्षक लक्ष्मण राख यांनी केले आहे.