एपीआय, ठाणे अंमलदार निलंबीत : बाते कम काम ज्यादा पिंगळे पॅटर्न
लातूर, लातूर जिल्ह्यात पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी पोलीस अधिक्षकाचा पदभार घेतल्यानंतर अवैध धंदे करणार्याचे धाबे दणाणले आहेत व पोलीस यंत्रणेत राहून चुकीच्या गोष्टीची पाठराखण करणार्यांना धडकी भरली असून गेल्या आठवड्यात पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी चाकूर येथील एपीआय व अहमदपूर येथील ठाणे अंमलदार यांना निलंबीत केले आहे.
त्यामुळं लातूर जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था प्रस्थापित होईल असं मत व्यक्त केलं जात आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर येथे जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी एक आठवड्यापूर्वी पदभार घेतला आहे. शांत स्वभावाचे, बाते कम काम ज्यादा हा दृष्टीकोण आणि पंढरपूर येथे डीवायएसपी, वर्धा येथे ऍडीशनल एसपी म्हणून त्यांनी काम केलं आहे. अवैध धंद्याचे कर्दनकाळ म्हणून त्यांची प्रतीमा आहे. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मातोश्री ह्या पुणे येथे डीवायएसपी होत्या. त्यांना पहिलाच लातूर येथे पोलीस अधिक्षक पदाचा पहिल्यांदाच पदभार मिळाला आहे. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकीक आहे.
यासंदर्भात पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी वरिष्ठ अधिकारी निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनात कायद्याप्रमाणे आणि नियमाप्रमाणे चाकूरचे एपीआय आणि अहमदपूर येथील ठाणे अंमलदार यांना निलंबीत केलेले आहे. याबाबत दै. मराठवाडा नेताला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस यंत्रणेतील स्वच्छता मोहीम निखील पिंगळे निश्चित राबवतील. गेल्या तीन दिवसापासून मटका पूर्णतः बंद आहे त्याचप्रकारे जे क्लब बेकायदा चालतात ते बंद आहेत आणि वरिष्ठ अधिकारी अर्थात निखिल पिंगळे हे शिस्तप्रिय असल्यामुळे लातूर जिल्ह्यात पोलीस अधिक्षक पटनायक यांच्याप्रमाणे पोलीस यंत्रणेला शिस्त लागेल आणि अवैध धंदे हद्दपार होतील अशाप्रकारचं खात्रीलायक वृत्त आहे.
दरम्यान, यासंदर्भात पोलीस यंत्रणेतील स्वच्छता त्याचबरोबर कांही पोलीस ठराविक ठिकाणी मठाधिपतीसारखे बसून आहेत त्यांचीही इतरत्र त्यांच्या ज्ञानाचा, कर्तव्यदक्षेचा वापर करुन घेतला जावा तसेच वाळु असेल किंवा अनेक धंद्यामध्ये अप्रत्यक्ष सहभाग व भूमाफियांनासुद्धा पायबंद असेल अशाप्रकारची चर्चा आहे. आमचा प्रतिनिधी कळवतो की, पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे हे कमी बोलणं आणि शिस्त लावणं म्हणजे बाते कम काम ज्यादा याप्रकारचा स्वभाव असल्यामुळे निश्चित लातूरच्या संपूर्ण पोलीस यंत्रणेला शिस्त लागेल. तसेच लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी हेसुद्धा सातत्यानं सज्जनाची बाजू आणि गुंडांचा विरोध करणारे असल्यामुळे लातूरात अवैध धंदे पूर्णतः उच्चाटन होईल. योगायोगानं औरंगाबाद परिमंडळाचे निसार तांबोळी हेसुद्धा या जिल्ह्यातीलच आहेत.
अशाप्रकारे लातूरात पुन्हा पोलीस यंत्रणेचा एक वेगळा दबदबा निर्माण होईल. सज्जनाला त्रास होणार नाही अशाप्रकारची अपेक्षा लोकांची आहे. दै. मराठवाडा नेताच्यावतीनं नुतन पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांना शुभेच्छा. त्यांनी अवैध धंदे बंद करत असतांनाच पोलीस यंत्रणेतील कोणी समर्थक तर नाहीत ना याचा बंदोबस्त करावा आणि तसेच पोलीसांची प्रतिमा जनतेचे मित्र निर्माण व्हावी, सज्जनाची रक्षक अशी निर्माण व्हावी अशीच अपेक्षा.