डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि माझी अनेकवेळा वेगवेगळ्या निमित्ताने भेट झाली. मला ते आपुलकीचं आणि बांधिलकीचं नाते जपणारं नेतृत्व त्यांच्याठायी दिसून आले.माझी आणि त्यांची कसल्याही प्रकारची राजकीय हेतूने भेट नव्हती. १९८०-८१ मध्ये गोविंदभाई श्रॉफ मराठवाड्याच्या प्रश्नासंदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन करत होते. मराठवाड्याला न्याय मिळाला पाहिजे, मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरुन निघाला पाहिजे अशी त्यांची भूमिका मला दिसून आली. मराठवाड्यात दोन मेडिकल कॉलेज, एक औरंगाबाद व एक अंबाजोगाई. फक्त दीडशे जागा होत्या. मुंबईला ५६० जागा होत्या. मराठवाड्यात फक्त एक इंजिनिअरींग कॉलेज होतं त्याकाळात आम्ही मराठवाड्याची लिवक गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वात आंदोलन करत होतो. एकवेळा गोविंदभाई श्रॉफ यांनी सांगितलं, तुम्ही युवक आणि विद्यार्थी माझ्याबरोबर मुंबईला चला मी तुम्हाला मराठवाड्याच्या मंत्र्यांची व मुख्यमंत्र्याची भेट घालून देतो त्यावेळा मराठवाड्याचे दोन मंत्री होते. १. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर व २. काळे, बॅ. अ.र. अंतुले हे मुख्यमंत्री होते. तिथ जावून भेटून आलो. त्यानंतर औरंगाबादला पहिली कॅबिनेटची मिटींग होती.
साधारणतः फेब्रुवारी १९८१ आम्ही मोर्चा काढला होता. त्यावेळा मुख्यमंत्री अंतुले म्हणाले, तुम्ही आंदोलन करणार नाहीत, मोर्चे काढणार नाहीत तर आम्हाला प्रश्न कसे लक्षात येतील. आमचा मोर्चा रस्त्यात अडवला. जवळजवळ ५०० विद्यार्थी मोर्चात होते. त्यापैकी विद्यार्थी नेत्यांना मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी घेवून जाण्यात आलं. सुभेदारी गेस्ट हाऊसवर आम्ही डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांना चिठ्ठी दिली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि आमची त्यावेळा चर्चा झाली. चर्चेनंतर कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ३५ कलमी कार्यक्रम जाहीर केला.औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय युवक महोत्सव होणार होता. मुंबईला पंतप्रधान इंदिरा गांधी येणार होत्या व त्या नंतर औरंगाबादला येणार होत्या. त्यांचा दौरा रद्द झाला. दौरा रद्द झाल्यानंतर आम्हाला अंतुलेसाहेबांचा फोन आला की, पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला आहे कसं करायचं, आम्ही सांगितलं आपण यावे आम्ही उद्घाटन करुन घेवूत.
त्यानंतर बॅ.अ.र. अंतुले उद्घाटक होते व डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.मला जिनेव्हा येथील निमंत्रण आले होते. मी भेटण्यासाठी गेलो त्यावेळा निलंगेकर साहेब म्हणाले काय गिल्डा काय काम होतं. त्यांना मी सांगितलं. ठीक आहे म्हणाले. दरम्यान मी अंतुलेसाहेबांना भेटून आलो त्यांनी मुख्यमंत्री निधीतून मला पैसे मंजूर केले. मी बाहेर येवून निलंगेकर साहेबांना सांगितलं. ते म्हणाले आता तुझं काय काम राहिलंय मी सांगितलं. माझ्याकडं पासपोर्ट नाही त्यावेळा निलंगेकर साहेबांनी त्यांचा पी.ए. शिंदे सोबत पाठवला त्यांना सांगितलं. गिल्डाबरोबर जा आणि तात्काळ त्यांचं पासपोर्ट मंजूर करुन आणा. मग मी आणि शिंदे पोलीस कमिशनर ऑफिस, पासपोर्ट ऑफिसला गेलो. त्यावेळा मी इंटरनशीप करत होतो. मला चार दिवसात पासपोर्ट मिळाला. मी व्हिसा काढला मला एक सांगावसं वाटतं की, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे बांधिलकीचे, आपुलकीचे नाते जपणारे नेते होते. नंतर जे.जे. हॉस्पिटलमध्ये मी आणि त्यांचे जावई डॉ. अरुण डावळे हे नोकरीला होतो. आमची आणि त्यांची जिव्हाळ्याचे संबंध होते आणि या काळात आमचं आणि निलंगेकर साहेबांचं वारंवार भेटणं होत होतं. मला एक जाणवलं आपुलकी, जिव्हाळा आणि बांधिलकी मानणारे ते नेते होते.डॉ.ईश्वर गिल्डा