हिंगोली / प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभुमीवर बंद असलेली एसटी सेवा २० ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली आहे. मात्र हिंगोली आगारातून सोडण्यात आलेल्या बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. राज्यातील अंतरजिल्हा बससेवा वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातून गुरूवारी २२ बस धावल्या. यामध्ये औरंगाबाद, बीड, अकोला, नांदेडसह इतर ठिकाणी बस सोडण्यात आल्या होत्या.
यातील सहा बस या हिंगोली आगारातून दोन-दोन प्रवासी घेऊन नांदेड, परभणीकडे धावल्या आहेत. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभुमीवर बससेवा सुरू झाली असली तरी नागरीकांनी मात्र सावधगिरी बाळगत प्रवास टाळला आहे. एक बसफेरी झाल्यानंतर बस सॅनिटाईज केली जात आहे
. त्याचबरोबर येणार्या प्रवाशांची टेम्परेचर गनद्वारे तपासणी केली जात आहे. एका बसची क्षमता ४४ प्रवासी नेण्याची असली तरी सध्या बसमध्ये केवळ २२ प्रवाशांनाच संधी दिली जात आहे. तसेच वृद्ध व लहान बालकांनी बसमधून प्रवास करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.