उस्मानाबाद / प्रतिनिधीउस्मानाबाद जिल्ह्यातील शनिवारच्या जनता कर्फ्यूला शिथीलता द्यावी या मागणीचे निवेदन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांना दिले आहे.या बाबत निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मीयांचा मोठा सण येत असून दरवर्षी मोठ्या उत्साहात व शांततेत हा सण जिल्ह्यात साजरा केला जातो.
शहरात व ग्रामीण भागातून अनेक भाविक गणेश मुर्ती व पुजेला साहित्य हार, फुले, नारळ इत्यादी साहित्य खरेदी करण्यासाठी शहरात येतात. उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी जनता कर्फ्यू असल्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाविक जनतेची गैरसोय होऊ नये,
यासाठी दि. २२ ऑगस्ट रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात जनता कर्फ्यूस शिथिलता देण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व गणेशभक्त कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे सोशल डिस्टन्स चे पालन करून हा सण साजरा करतील तरी शनिवार रोजीचा जनता कर्फ्यूला शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.