अंमलबजावणी ः पालकमंत्री शंकरराव गडाखउस्मानाबाद, दि. १६ :….स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने व राज्याने सामाजीक,शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली आहे. सर्व सामान्य नागरिकांसह समाजातील मागासवर्गीय व दुर्बल घटकांतील व्यक्तींची उन्नती व्हावी, त्यांची आर्थिक प्रगती वेगाने होऊन ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल व्हावेत. म्हणून आपले शासन त्यांच्यासाठी विकासाच्या अनेक योजना कार्यक्षमपणे राबवित असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी भारतीय स्वातंत्रय दिनाच्या ७३ वा वर्धापन समारंभ प्रसंगी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, खासदार ओमराजे निबांळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी चारूशिला देशमुख, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे,तहसिलदार गणेश माळी, जि.प.उपाध्यक्ष धनजंय सावंत,महिला बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे, कृषी सभापती दत्ता साळुके, स्वातंत्रय सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदिसह इतर मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.