तुळजापुर / महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनांचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेचा दि.३१ शनिवार रोजी आश्विन कोजागिरी पोर्णिमा उत्सव भाविकाविना तीर्थक्षेत्र तुळजापुरात साजरा झाला. शारदीय नवरात्र महोत्सवानंतर येणार्या आश्विन कोजागिरी पोर्णिमा निम्मीत दर वर्षी भक्ताचा महापुर ओसंडुन वाहत असतो या वर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आश्विन पोर्णिमा उत्सव भाविकांविनाच साजरा झाला.
श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना संसर्गजन्य कोरोनामुळे दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता.या वर्षीचा आश्विन पोर्णिमेचा खेटा भक्तांना झाला नसल्यामुळे त्यांचा भ्रम निरास झाला तत्पुर्वी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नंतर विजयादशमीचे सोमवारी श्री देवी सिमोल्लघंन झाल्यानंतर पाच दिवसाच्या मंचकी निद्रे नंतर दि.३१ पहाटे २/३० वाजता श्री तुळजाभवानी मातेची मुख्य चलमुर्ती सिंह गाभार्यातील लाकडी पलंगावरती निद्रीस्त असलेली श्री तुळजाभवानी मातेची मुर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली.त्यानंतर श्री देवीजीस पंचामृत अभिषेक करुन वस्त्र अलंकार पुजा करण्यात आली.

या वेळी श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा , महंत हमरोजी बुवा, श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे विश्वस्थ तथा तहसीलदार सौदागर तांदळे , धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले,मंदीर कर्मचारी जयसिंग पाटील , पाळीचे मुख्य भोपे पुजारी अजित परमेश्वर , आदीसह भोपे पुजारी ,पाळीकर पुजारी , उपाध्ये पुजारी सेवेदार मंदीर कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर सकाळी ६ वाजता श्री देवीजीस पुन्हा पंचामृत अभिषेक पुजा करुन वस्त्र अलंकार घालण्यात आले यानंतर श्री देवीची अश्विनी पोर्णिमा निम्मीत नित्योपचार पुजा करुन धुपारती करण्यात आली.

अंगारा काढण्यात आला. श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात आश्विन कोजागीरी पोर्णिमा दिनी पुणे येथील श्री देवी भक्त आर . आर .किराड यांच्याकडुन संपुर्ण मंदीरासह शिवाजी दरवाजा , राजेनिंबाळकर दरवाजा, होम कुंड , राजमाता जिजाऊ महाद्वार व राजे शहाजी महाद्वार या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षापासुन आश्विन पोर्णिमा दिनी श्री देवीच्या चरणी मोफत सेवा समर्पीत करण्यात येत आहे.श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीर परिसर आदीसह सर्व भागात विविध प्रकारच्या देशी विदेशी फुलांची नेत्र दिपक फुलांची सजावट करण्यात आली होती. सायंकाळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरात रुढी परंपरेने सोलापूर येथील शिवलाड तेली समाज बांधवाच्या काठ्या सोबत कोजागिरी आश्विनी पोर्णिमेचा छबिना काढण्यात आला.
