लातूर,:उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील सास्तुर या गावातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत त्या पिडीतीच्या तब्येतीची चौकशी करून तिच्या नातेवाईकांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन धीर दिला. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या संबंधीतांना सूचना दिल्या.
समाजातील अशा वाईट कृतीला सरकार पाठिशी घालणार नाही. राज्य सरकार या पिडीत कुटुंबा सोबत खंबीर पणे उभे आहे. आरोपींना शिक्षा मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
यावेळी बनसोडे त्यांनी पिडीतावर उपचार करणार्या डॉक्टर सोबत चर्चा करुन पिडीताच्या प्रकृतीची विचाराणा केली यासोबतच पिडीताच्या नातेवाईकांना धीर देऊन काही आर्थिक मदत ही त्यांनी केली. यावेळी विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन डोईबळे, उप अधिष्ठाता डॉ शेलेद्र चव्हाण, डॉ. उदय मोहिते तसेच प्रशांत पाटील, प्रा.अंकुश नाडे, सुदर्शन बिराजदार, राजकुमार जाधव, समीर शेख आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती.