नांदेड दि. २० ऑगस्ट
अमृतसर जिल्ह्यातील भूमा गावातील रहिवाशी स. बरागसिंघ हे एका महिन्याचे सायकल प्रवास करून नांदेडच्या गुरुद्वाराच्या दर्शनार्थ उपस्थित झाले. विशेष म्हणजे वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांची नांदेडची १३ वीं सायकल वारी होय. स. बरागसिंघ हे दि. १६ जुलै २० रोजी अमृतसर येथून सायकल यात्रा सुरु करत हजुरसाहेब नांदेड कडे निघाले होते. लुधियाना, अंबाला, दिल्ली, आगरा, ग्वालियर, इंदौर, बुरहानपुर, हिंगोली होत जवळपास एक महीना नंतर त्यांनी दि. १६-०८-२० रोजी नांदेड गाठले. गुरुद्वारा तखत सचखंड साहेब आणि गुरुद्वारा लंगरसाहेबचे त्यांनी दर्शन घेतले. चर्चा करत असतांना बरागसिंघ म्हणाले, वृद्धापकाळामुळे मला पुढे अशी यात्रा करणे कठिन दिसत आहे.
तेव्हा ही माझी शेवटची सायकल यात्रा आहे. मी सायकल वर संपूर्ण देशाची यात्रा केली आहे. सर्व धर्मस्थळांचे दर्शन घेतले. स्वस्थ राहण्याच्या उदेश्याने सायकल यात्रा घडत गेल्या. पण पुढे शक्यता कमी वाटते. येथून गुरुजींचे आशीर्वाद घेऊन आपल्या गावी शेती करेन.
जर नशिबात पुढे दर्शन करण्याची संधि मिळाली तर एखाद्या वेळी ट्रक यात्रा जरूर करेन. बराग सिंघ यांना दोन मूलं आणि नाटवंडे असून ते गावात शेती करतात. या शेवटच्या यात्रेत बरागसिंघ यांच्या जवळील पैसे संपले असून यांना आर्थिक मदतीची देखील गरज आहे. शीख समाजातील इच्छुक दानी व्यक्तींनी वयोवृद्ध स. बरागसिंघ यांना आर्थिक मदत करावी असे आवाहन पत्रकार स. रवीन्द्रसिंघ मोदी यांनी केले आहे.