हिंगोली : ज्ञानेश्वर लोंढे
गेल्या काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी २४ फेब्रुवारी पासून रात्री ७ ते सकाळी ७ या कालावधीत संचारबंदीचे आदेश काढले आहेत .
हिंगोली शहरासह जिल्हाभरात रुग्णसंख्या वाढत आहे शहरातील शास्त्रीनगर भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. तसेच विना मास्क फिरणार्यांना दंड लावला जात आहे .
तरी सुद्धा नागरिक गांभीर्याने घेत नसल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बुधवार दि २४ फेब्रुवारी पासून रात्री ७ ते सकाळी ७ वा पर्यंत संचारबंदी लागू केली आहे . या काळात केवळ दूध विक्रेते , जिल्हयातील शासकीय निम शासकीय कार्यालय , बँका , तसेच रुग्णालय संलग्न असलेली औषधी दुकाने , पत्रकार व कार्यालयीन कर्मचारी , त्याचबरोबर शासकीय कर्तव्य पार पडणारे अधिकारी कर्मचारी , त्यांना ओळखपत्र बाळगून मुभा देण्यात आली आहे . तर या कालावधीत पेट्रोल पंपावर शासकीय सेवा देणारी वाहने ,अत्यावश्यक सेवा देणारी वाहने , व कृषी सेवा संबंधित वाहने , यानाच इंधन पुरवठा चालू राहणार आहे . तसेच या काळात कोणत्याही खासगी दुकान , खानावळ, हॉटेल यांना परवानगी राहणार नाही वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल अशा इशारा हि जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला आहे
जिल्ह्यातील सर्व दुकानदार , प्रवाशाची होणार टेस्ट
जिल्ह्यातील सर्व दुकानदार , प्रवाशाची होणार टेस्ट कोरोना साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिह्यातील सर्व आस्थापना मालक , दुकानदार यांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट होणार आहेत त्याच बरोबर जिल्ह्यात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्याकरिता १ किलोमीटर च्या अंतराने दोन कॅम्प उभारण्यात यावे असे आदेश रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत
लग्न समारंभास परवानगी बंधनकारक
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या पूर्वीच जिल्ह्यातील मंगल कार्यालयांना नोटिसी बजावून नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड आकारण्यात येईल असे आदेश काढले आहेत आता लग्न समारंभासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास वधू -वर पक्षातील नातेवाईका सह मंगल कार्यालय मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे .