प्रा. रामेश्वर बद्दर रेणापूरकर
लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघात युवा नेते, कुशल संघटक, उच्चशिक्षीत, मनमिळावू व सर्वांशी लोकसंपर्क असलेले अरविंद पाटील निलंगेकर यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी द्यावी, अशाप्रकारची मागणी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, जि.प. माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी सभापती, शिक्षण सम्राट बापूराव राठोड, जि.प. माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे यांच्यासह अनेकजण हायकमांडकडे मागणी करणार आहेत.
पदवीधर मतदार संघ नोंदणी सुरु असतांना लातूर जिल्ह्यातील युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर जे कुशल संघटक आहेत, त्यांनी वेगवेगळे प्रकल्प राबवलेले आहेत. फक्त सभासद नोंदणी अभियानात त्यांनी एक वेगळा पॅटर्न निर्माण केलेला आहे. छत्रपती शिवाजी राजेंची रांगोळी असेल किंवा निलंगा येथील अटल वॉक असेल, लातूर येथील राष्ट्रध्वजाचा कार्यक्रम असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्म अभ्यास, जिल्हा परिषदेची निवडणूक असो, लातूर महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा सुरेश धस यांची विधान परिषदेची निवडणूक असो या सर्व निवडणुकीत अत्यंत कुशलतेने सूक्ष्म नियोजन करुन भाजपचा झेंडा फडकवण्याचं काम केलं. त्यांचं संघटन कौशल्य, दूरदृष्टी, लातूर येथे साजरी करण्यात आलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, त्याचबरोबर लातूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत उमेदवारी निश्चित करीत असतांना अनेकांना पक्षात प्रवेश देवून उमेदवारी निश्चित करणे आणि त्यासाठी सर्व डावपेच मांडून त्यांचं काम करण्याचा प्रयत्न, लातूर येथे सध्याचे भारताचे गृहमंत्री यांच्या सभेचं नियोजन असेल, असं एक आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व आहे.
त्यांचं वैयक्तिक मित्रमंडळ उस्मानाबाद जिल्हा, नांदेड जिल्हा, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, बीड येथे आहे. पक्षाचे कार्यकर्ते, सर्व नेते, पदाधिकारी यांनी जर ठरवलं तर अरविंद पाटील निलंगेकर विजयी होवू शकतात. यासंदर्भात आम्ही नांदेड, बीड, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध पक्षाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांचा अरविंद पाटील निलंगेकर यांच्या उमेदवारी संदर्भात सकारात्मक दृष्टीकोण आहे. अनेकजणांनी रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संपर्क साधला आहे. मागणी जोर धरत आहे. खा. प्रताप पाटील चिखलीकर, लातूरचे खासदार सुधाकरराव श्रृंगारे, सर्व लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या युवक संघटना या सर्वांची तिव्र इच्छा अरविंद पाटील निलंगेकर यांना उमेदवारी द्यावी अशाप्रकारची आहे. कोरोनाच्या काळात कोरोनाने मृत्यू पावलेल्यांच्या घरी जाणं, त्यांना मदत करणं आणि या हाताने मदत केलेली त्या हाताला न कळू देणं हा त्यांचा स्वभाव आहे.
या जागेवर विजय मिळविण्यासाठी छोटू पाटील ऊर्फ अरविंद पाटील निलंगेकर यांना जर उमेदवारी दिली तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चमत्कार घडू शकतो. यासंदर्भात अनेकांशी संपर्क आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी साधला असता अरविंद पाटील निलंगेकर हे सरस ठरु शकतात. शेवटी हायकमांड चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, पंकजाताई मुंडे, चिखलीकर, डॉ. गोपछडे, सुजितसिंह ठाकूर, रातोळीकर, तुषार राठोड, राणादादा पाटील, सुरेश धस अशा अनेक लोकांकडे उमेदवारी संदर्भात लोकांनी संपर्क साधायला सुरु केला आहे. एकंदरीत अरविंद पाटील निलंगेकरांची उमेदवारी म्हणजे विजयावर शिक्कामोर्तब असं म्हटलं जात आहे.
दै. मराठवाडा नेताशी बोलतांना जि.प. अध्यक्ष राहूल केंद्रे, माजी जि.प. उपाध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषदेचे संचालक रामचंद्र तिरुके, शिक्षण सम्राट बापूराव राठोड यांनी अरविंद पाटील निलंगेकर यांना उमेदवारी मिळावी अशाप्रकारची मागणी केलेली आहे.
एकंदरीत अरविंद पाटील निलंगेकर यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्याग केला, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतही त्याग केला आणि एकंदरीत मराठवाड्यात सर्वांगिण अभ्यास असलेला तरुण म्हणून अरविंद पाटील निलंगेकरांना उमेदवारी मिळावी असंच अनेकांचं मत आहे.