हिंगोली / स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास खानापूर ते अंभेरी रस्त्यावर पेट्रोलिंग करीत असताना अवैध वाळुची चोरटी वाहतुक करणारे तीन ट्रॅक्टर पथकाच्या कर्मचार्यांनी ताब्यात घेतले. तीन ट्रॅक्टर, ट्रॉली असा एकूण १७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास तीन ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या वाळुची वाहतुक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेतले. या कारवाईत जनार्धन ज्ञानेश्वर गंगावणे, विश्वदिप पाईकराव, गजानन गंगावणे, प्रकाश कांदे, आकाश कांदे, विष्णु कांदे यांच्याविरूद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ ब्रास वाळु व तीन ट्रॅक्टर असा एकूण १७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, विलास सोनवणे, संभाजी लेकुळे, भगवान आडे, किशोर कातकडे, सुनिल अंभोरे, दिपक पाटील यांच्या पथकाने केली.