हिंगोली/प्रतिनिधी : प्रतिकुल परिस्थितीत राजमाता मॉ साहेब जिजाऊ यांनी आठरा पगड जातींच्या लोकांसाठी छत्रपती शिवरायांना सोबत घेवून स्वराज्य उभे केले. मॉ साहेब जिजाऊ यांच्या संघर्षातून प्रेरणा घेवून आपण यशाची शिखरे पादाक्रांत केली पाहिजे असे आवाहन राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी मंगळवारी 12 जानेवारी रोजी हिंगोली येथे बोलतांना केले.
मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवराय पुर्णाकृती पुतळा परिसरात 12 जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री अर्जून खोतकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जेष्ठ स्वातंत्र सैनिक माणिकराव टाकळगव्हाणर, जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, आ. तान्हाजीराव मुटकुळे, आ. संतोष बांगर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनिष आखरे, जि.प. सभापती फकीरा मुंडे, मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे पाटील, जि.प. सदस्या मालती कोरडे, युवा नेते राम कदम, गुड्डू बांगर, वधू-वर कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडेराव सरनाईक, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ढोकर पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव लोंढे, हमीद प्यारेवाले, सुनिताताई मुळे, ज्योतिताई कोथळकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा राजश्रीताई क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना महसूल राज्य मंत्री अब्दूल सत्तार म्हणाले की, मॉ साहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना बालपणी केलेले संस्कार आज आईंनी आपल्या मुलावर केले पाहिजे तरच छत्रपती शिवरायांच्या विचाराचे वारस तयार होतील. तसेच स्वामी विवेकानंदांची बुध्दीमत्ता आपल्या पाल्यांमध्ये आली पाहिजे यासाठीही आपण प्रयत्न केले पाहिजे असेही ना. सत्तार म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंडित अवचार, हरिभाऊ मुटकुळे, पंडित शिरसाठ, राजकुमार वायचाळ, विश्वास वानखेडे, प्रा. जयप्रकाश पाटील, दिलीप घ्यार, प्रा. सुधाकर इंगोले, उल्हास पाटील, ज्ञानेश्वर लोंढे, श्याम सोळंके, प्रा.डॉ. मनिषा अवचार, वर्षा सरनाईक, कांताबाई कल्याणकर, रेखा देशमुख, डॉ. शितल कल्याणकर, रेखाताई पडोळे, जया सावके, वृषाली पाटील, शितल सावके, जया पवार, माया गवळी, सुनिता सवनेकर, इंगोलेताई, सुषमाताई देशमुख, सुनिता कव्हर, मिनाक्षी शिंदे आदींनी परिश्रम घेतले.