Marathwadaneta.com : Latest Marathwada News In Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • ब्रेकिंग
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम
  • देश
  • अर्थ
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • विदेश
  • ट्रेंडीग
  • स्पेशल स्टोरी

ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी मोठा ओघ; अनेक नेते संपर्कात : बाळासाहेब थोरात

marathwadaneta by marathwadaneta
November 11, 2020
1 min read
0
काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी मोठा ओघ; अनेक नेते संपर्कात : बाळासाहेब थोरात
ADVERTISEMENT

मुंबई, : काँग्रेस विचारांवर श्रद्धा असलेला, काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून हा विचार बळकट करण्यासाठी अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. आज सातारा व ठाणे जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्यभरातून अनेक नेते कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये येण्याचा ओघ वाढला असून अनेकजण संपर्कात आहेत. लवकरच ते ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसची ताकद राज्यात आणखी वाढण्यास यामुळे मदतच होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

RELATED POSTS

पंढरपूर येथे दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन!

पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी सरकार योग्य ते नियोजन करेल – विधानसभाध्यक्ष

आनंद घ्या, पण भान ठेवा! सुरक्षितपणे दिवाळी साजरी करा – मुख्यमंत्री ठाकरे

आज गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तरूण नेते  रणजित देशमुख   व ठाणे जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,  प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा व महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील, आ. भाई जगताप, सरचिटणीस माजी आ. मोहन जोशी, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, यशवंत हाप्पे, गजानन देसाई, सचिव जोजो थॉमस आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा गरिब, सामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांना ताकद देणारा पक्ष आहे. मध्यंतरी थोडा कठीण काळ आला होता त्यावेळी काही जण पक्ष सोडून गेले.‘सुबह का भुला शाम घर वापस आये तो उसे भुला नही कहते’. काँग्रेस सोडून गेलेले काँग्रेसमध्ये पुन्हा येत आहेतच पण इतर पक्षातीलही अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तुम्ही पक्षासाठी कार्य करा, तुम्ही मोठे झालात तर पक्षही मोठा होईल. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष बळकट करा आणि काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन द्या, असे आवाहन थोरात यांनी केले.

ADVERTISEMENT

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, रणजित देशमुख यांनी सातारा जिल्ह्यातील खटाव माण या दुष्काळी भागात सहकाराच्या माध्यमातून या भागाचे चित्र बदलण्याचे काम केले आहे. परवाच विलासकाका पाटील उंडाळकर, उदयसिंह उंडाळकर हे स्वगृही परतले आणि आज रणजित देशमुख यांच्या रुपाने पक्षाला आणखी ताकद मिळाली आहे. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काम करा आणि जिल्हा काँग्रेसमय करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बाळासाहेब थोरात यांचा पायगुण चांगला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस पक्ष विस्तारत असून ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दोन महिन्याच काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यातील सत्तेत सहभागी होऊ शकली. त्यांच्या नेतृत्वाखाली तरुणांना पक्षात काम करण्यास मोठा वाव आहे, असे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले.

रणजित देशमुख यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य भारतराव शंकरराव जाधव, हनुमान शिक्षण प्रसारक मंडाळाचे अध्यक्ष संजीव साळुंके, बाळासाहेब झेंडे, संतोषराव पवार, निलेश जाधव, विजय शिंदे यांनी तर दयानंद चोरगे यांच्यासह भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती मोतीराम चोरघे, भिवंडी महानगरपालिका बांधकाम समितीचे माजी सभापती , माजी शिवसेना महानगर प्रमुख, भाजपाचे ठाणे पालघरचे माजी विभागीय संघटक तुकाराम चौधरी, शिवसेना माजी विभाग प्रमुख गणेश चौधरी, प्रभाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सदस्य सुरेश जोशी, भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष संजय बापू पाटील, भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण शिक्षक आघाडीचे अध्यक्ष देवेंद्र भेरे,नवनाथ सुतार, देविदास केणे यांच्यासह भिवंडी, कल्याण मधील असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करु असे रणजित देशमुख व दयानंद चोरगे यावेळी म्हणाले

Tags: Balasaheb ThoratCongressMaharashtraMumbaiPolitics
ShareTweetSendShareSend
marathwadaneta

marathwadaneta

Related Posts

पंढरपूर येथे दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन!
महाराष्ट्र

पंढरपूर येथे दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन!

November 19, 2020
87
पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी सरकार योग्य ते नियोजन करेल – विधानसभाध्यक्ष
महाराष्ट्र

पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी सरकार योग्य ते नियोजन करेल – विधानसभाध्यक्ष

November 19, 2020
48
आनंद घ्या, पण भान ठेवा! सुरक्षितपणे दिवाळी साजरी करा – मुख्यमंत्री ठाकरे
महाराष्ट्र

आनंद घ्या, पण भान ठेवा! सुरक्षितपणे दिवाळी साजरी करा – मुख्यमंत्री ठाकरे

November 11, 2020
58
हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय
महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय

November 10, 2020
73
जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच वैद्यकीय महाविद्यालय उभारणीची प्रक्रिया सुरू करा – मुख्यमंत्री ठाकरे
महाराष्ट्र

जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच वैद्यकीय महाविद्यालय उभारणीची प्रक्रिया सुरू करा – मुख्यमंत्री ठाकरे

November 10, 2020
55
‘माझी भिंत’ पुस्तकाचे राज्यपाल  कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन
महाराष्ट्र

‘माझी भिंत’ पुस्तकाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

November 10, 2020
107
Next Post
नाईक कुटुंबीय आणि ठाकरे यांच्यातील  जमीनींच्या खरेदी व्यवहाराची चौकशी करा

नाईक कुटुंबीय आणि ठाकरे यांच्यातील जमीनींच्या खरेदी व्यवहाराची चौकशी करा

पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी सरकार योग्य ते नियोजन करेल – विधानसभाध्यक्ष

पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी सरकार योग्य ते नियोजन करेल - विधानसभाध्यक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

जिल्हाध्यक्षपदी राजश्री क्षिरसागर

जिल्हाध्यक्षपदी राजश्री क्षिरसागर

August 22, 2020
80
जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच वैद्यकीय महाविद्यालय उभारणीची प्रक्रिया सुरू करा – मुख्यमंत्री ठाकरे

जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच वैद्यकीय महाविद्यालय उभारणीची प्रक्रिया सुरू करा – मुख्यमंत्री ठाकरे

November 10, 2020
55

Trump pivots hard away from fight against unvanquished pandemic

June 21, 2020
11

Popular Stories

  • ममत्व हरवलेल्या चिमुकल्याची सलमा झाली माता स्तनपान करणाऱ्या त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे कौतुक

    ममत्व हरवलेल्या चिमुकल्याची सलमा झाली माता स्तनपान करणाऱ्या त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऑफलाईन पध्दतीने स्विकारले जाणार ग्रामपंचायतीसाठी नामनिर्देशनपत्र ऑनलाईनची डोकेदु:खी मिटली, वेळही मिळाला वाढून

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणारे दोघे गजाआड,किंमत ऐकून थक्क व्हाल, कशासाठी होतो उपयोग ?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Immunity-Boosting Foods a Nutritionist Recommends

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • बर्निंग ट्रव्हल्सचा थरार औंढा, हिंगोलीचे प्रवासी सुखरुप

    0 shares
    Share 0 Tweet 0
ADVERTISEMENT
Marathwadaneta.com : Latest Marathwada News In Marathi

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Visit our landing page to see all features & demos.

LEARN MORE »

Recent Posts

  • भय इथले संपत नाही.! नवविवाहितेचा गळा आवळून खून, आठवड्यातील दुसरी घटना
  • मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणारे दोघे गजाआड,किंमत ऐकून थक्क व्हाल, कशासाठी होतो उपयोग ?
  • ममत्व हरवलेल्या चिमुकल्याची सलमा झाली माता स्तनपान करणाऱ्या त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे कौतुक

Categories

  • क्राईम
  • क्रीडा
  • देश
  • ब्रेकिंग
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • स्पेशल स्टोरी

© Copyright 2020, All Rights Reserved Marathwadaneta.com : Latest Marathwada News In Marathi Website Design by ATS Metro Media 9665762303

No Result
View All Result
  • Home
  • ब्रेकिंग
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम
  • देश
  • अर्थ
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • विदेश
  • ट्रेंडीग
  • स्पेशल स्टोरी
  • Contact Us

© Copyright 2020, All Rights Reserved Marathwadaneta.com : Latest Marathwada News In Marathi Website Design by ATS Metro Media 9665762303

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?