जिरेवाडी-जालना रोड-शिवाजी महाराज पुतळा-बार्शीनाका-कोल्हारवाडी या 12 कि.मी.रस्त्याचा प्रश्न लागणार मार्गी; बायपासला स्लीप सर्व्हिस रोडही होणार बीड (प्रतिनिधी):- बीड शहरासह मतदारसंघातील जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाची पुर्तता करण्याबाबतची धडपड आ.संदीप क्षीरसागर करत असल्याचे दिसून येत आहे.
काल विविध प्रश्नांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांची भेट घेऊन मतदार संघातल्या अडीअडचणी सांगितल्यानंतर शहरातून जाणार्या धुळे-सोलापूर रस्त्याच्या प्रश्नी केंद्रीय रस्ते, बांधकाम व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची खा.पवारांनी भेट घडवून आणली तेव्हा आ.संदिप क्षीरसागर यांनी बीड शहरातील कोल्हारवाडी-बार्शी नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक-जिरेवाडी 12 कि.मी.रस्ता व बाह्यवळण रस्त्याला सर्व्हिस रोड तातडीने करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी ना.गडकरी यांनी सविस्तर चर्चा करत सदरचे काम तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन देत संबंधितांना तात्काळ निर्देश दिले.
गेल्या अनेक वर्षापासून रखडत पडलेला बीड शहरातील रस्त्याच्या प्रश्नासह बाह्यवळण रस्त्याला सर्व्हिस रोड व स्लिप रोडचा प्रश्न मार्गी लागणार आहे. बीड शहरालगत बायपास झाल्यानंतर शहरातून जाणार्या 12 कि.मी. रस्त्याचे काम मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित होते. आ.संदीप क्षीरसागर यांनी जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाची जाण ठेवत ते कामे प्रगतीपथावर जावेत म्हणून पाठपुरावा करत असल्याने शहरासह मतदार-संघातील कामे जलदगतीने होत आहेत. आ.संदिप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांची भेट घेऊन मतदार-संघातल्या अडीअडचणी सांगितल्या त्याचबरोबर बीड शहरातून जाणार्या धुळे-सोलापूर महामार्गावरील जीरेवाडी, जालना रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कोल्हारवाडी या 12 कि.मी.च्या रस्त्याचे काम, रस्ता सुधारणा, सुशोभीकरण, नुतनीकरण, स्लिप रोड, सर्व्हिस रोडचे अद्याप काम झालेले नाही.
याबाबत खा.शरदचंद्रजी पवारांनी आ.संदीप क्षीरसागर यांची थेट केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घडवून आणली. आ.क्षीरसागरांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्याबाबत सविस्तर निवेदन दिले. यावेळी गडकरी यांनीही विकास कामे जलदगतीने व्हावेत, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सदरचे काम हे लवकरात लवकर तातडीने मार्गी लावण्याबाबतचे निर्देश देऊ असे आश्वासन दिले. आ.संदिप क्षीरसागर यांनी सदरच्या प्रश्नाचा पाठपुरावा करत राहिल्यामुळे येत्या काही दिवसात जिरेवाडी ते कोल्हारवाडी या शहरातून जाणार्या रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. आ.क्षीरसागर विकास कामासाठी धडपडत असून जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाची पुर्तता करण्यासाठी ते सातत्याने वरिष्ठ मंत्र्यांच्या संपर्कात राहतांना दिसून येत आहेत.