चाकूर, : चाकूर तालूक्यातील मौजे आष्टा येथे अज्ञात चोरट्यांनी लोखंडी खिडकी तोडून घरात प्रवेश केला. रोख रक्कम, सोन्याचांदीचे दागीने असा तब्बल दीड लाख रुपयांचा ऐवज पळवण्यात आला आहे.
या चोरी प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात अतूल नारायण चौधरी रा. आष्टा यांनी दिलेल्या तक्रार दिली आहे. फिर्यादीच्या घराच्या पाठीमागील लोखंडी खिडकी काढून चोरटे घरात शिरले. चोरट्यांनी कपाटाचे लॉकर तोडून रोख रक्कम ३२ हजार रुपये, एक तोळा सोन्याचे गंठण, १३ ग्रॅम सोन्याचे वेली व झुमके, ७ ग्रॅम सोन्याचे लॉकेट, लहान मुलांचे दोन सोन्याचे बदाम, नथ, मणी, रिंग असे ७ ग्रॅमचे दागीने व चांदीचे ८ तोळ्याची चैन असा सुमारे दीड लाखांचा हजाराचा ऐवज पळवला. चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.