हिंगोली /प्रतिनिधीऔरंगाबादचे संभाजीनगर नामांतर व्हावे ही शिवसेना प्रमुंख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे निर्णय घेत आहेत. मात्र हा निर्णय घेतांना मित्रपक्षांना विश्वासात घेतले जाणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंगोली येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारा निमित्त जिल्ह्याच्या इतिहास पहिल्यांदाच राज्यमंत्री अब्दुल सत्तार प्रचारसभा निमित्त आले. त्यांची पहिली सभा बळसोंड येथे झाली दुसरी प्रचारसभा खानापूर चीत्ता, त्यानंतर आखाडाबाळापुर येथे घेतली. यावेळी आ. संतोष बांगर, माजी मंत्री अर्जुन खोतकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, माजी खा. शिवाजीराव माने उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, शिवसेनेचे पदाधिकारी राम कदम, संतोष गोरे आदीची उपस्थित होती.खानापूर चित्ता येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. अच्छे दिनच्या घोषणा करणाऱ्यांनी आज पेट्रोल डिझेल चे भाव वाढले या इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस शेतकरी पिचला जात आहे.
हेच का ते अच्छे दिन असा सवाल करीत त्यांनी केंद्र सरकारवर टीका करताना राज्याच्या हक्काचे जीएसटी( वस्तुकर)चे एक वर्षातील 38 हजार कोटी अद्याप दिले नाही, हे केंद्र सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रचार सभेत नंतर पत्रकारांनी औरंगाबाद की संभाजीनगर असा प्रश्न केला असता यावेळी ना. अब्दूल सत्तार म्हणाले की, औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर ही, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मित्र पक्षांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतील. महत्वकांशी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना बंद केल्याचा आरोप माजी मंत्री लोणीकर यांनी केला यावर विचारले असता, हे त्यांचे वक्तव्य चुकीचे असून दिशाभूल करणारे आहे. संपूर्ण राज्यातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर योग्य नियोजन करून राज्यातील पाणी प्रश्न निश्चितच सोडवला जाईल असे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणुकीबाबत भाजपाच्या दाव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. विधान परिषदत निवडणुकीच्या वेळीही भाजपाने सर्व सहा जागांवर विजय मिळविण्याचा दावा केला होता. मात्र त्यांना केवळ एकच जागा मिळाली आहे. राज्यातील एकूण ग्रामपंचायतीच्या १५ टक्के ग्रामपंयतीही त्यांना जिंकता येणार नाहीत. या निवडणुकीच्या मतमोजणीनंतर निवनिर्वाचीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेच्या व्यासपीठावर सत्कार केला जाईल. त्यावेळी शिवसेनेला किती ग्रामपंचायती मिळविता आल्या हे स्पष्ट पणे दिसून येईल असेही ना. सत्तार यांनी सांगितले त्यांनी सांगितले.