नांदेड दि. 31 – (प्रतिनिधी) सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानत काँग्रेस सरकारने नेहमीच निर्णय घेतले. देशाच्या नेत्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले. त्यामुळेच शेतकर्यांना कर्ज मिळण्याची व्यवस्था झाली. मात्र आताचे मोदी सरकार धनदांडगे व उद्योगपतींचे हित व शेतकरी, सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे निर्णय घेत आहे. या मोदी सरकारला शेतकरी व सर्वसामान्य जनताच उत्तर देईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
केंद्र सरकाराने पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर जे कृषी व कामगार कायदे मंजूर केले. हे कायदे शेतकरी व कामगाराच्या विरोधात असल्याचा आरोप करत काँग्रेससह विरोधी पक्षांनी देशभर आंदोलन पुकारले आहे. काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून माजी केंद्रिय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून किसान अधिकार दिवस साजरा करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून येथील काँग्रेस पक्षाच्या वतिने शनिवार दि. 31 ऑक्टोबर रोजी ना. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी नवा मोंढा ते गांधी पुतळा प्रतिकात्मक ट्रॅक्टर मार्च व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन केले. यावेळी ना. अशोकराव चव्हाण बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ना. अशोकराव चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर करुन घेतलेल्या कृषी व कामगार कायद्यामुळे शेतकरी व कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. तर या कायद्यांचा फायदा उद्योगपतींना होणार आहे. कृषी कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पडण्यांची शक्यता आहे. यामुळे यापुढे शेतकर्यांच्या मालाला भाव मिळणार नाही. या कायद्यामुळे शेतकर्यांचे जीवन उद्धवस्त होणार आहे. या कायद्याचा विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाने देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. मोदी सरकारच्या ‘हम करे सो कायदा’ धोरणाला शेतकरी व सर्वसामान्य जनताच उत्तर देईल असा ईशारा ना. अशोकराव चव्हाण यांनी दिला.
याप्रसंगी आ. अमरनाथ राजुरकर यांनी प्रास्ताविकात कृषी व कामगार कायदे शेतकरी व कामगाराच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करत काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली तर माजी पालकमंत्री डी.पी. सावंत आ. मोहन हंबर्डे माजी महापौर अ. सत्तार काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय लहानकर, डॉ. रेखा चव्हाण,रामराव पा. भोगावकर यांनी मोदी सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणावर कठोर शब्दात टिका केली आहे. काँग्रेसच्या प्रतिकात्मक ट्रॅक्टर मार्च व सत्याग्रह आंदोलनास मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, कामगार आदिंची उपस्थिती होती. सोशल डीटस्नसीचा पालन करीत हे आंदोलन संपन्न झाले.
याप्रसंगी विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद व महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, आ. मोहन हंबर्डे, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी खा. सुभाष वानखेडे, उपमहापौर मसूद खान, मनपा स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, सभागृह नेता विरेंद्रसिघ गाडीवाले, जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, समाज कल्याण सभापती अॅड. रामराव नाईक, मुदखेडचे नगराध्यक्ष मुजीब जहांगिरदार, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, जि.प.चे माजी सभापती माधवराव मिसाळे, नगरसेवक बालाजीराव जाधव, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, मजूर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्णीकांत गोणे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कविताताई कळसकर, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे, युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु कोंढेकर, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, महिला काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी डॉ. रेखा पाटील, अनिता हिंगोले, मंगलाताई धुळेकर, मनपाच्या सभापती सविता बिरकले, ज्योत्स्ना गोडबोले, माजी महापौर अब्दुल सत्तार, बलवंतसिंघ गाडीवाले, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, काँग्रेसचे तालूकाध्यक्ष अॅड. निलेश पावडे, केशवराव इंगोले, संभाजी भिलवंडे, बालाजी पांडागळे, बालाजी गव्हाणे, उद्धवराव पवार, शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, प्रकाश भोसीकर, कल्याण सुर्यवंशी, नागनाथ गड्डम, सतीश देशमुख तरोडेकर, संतोष मुळे, किसन कल्याणकर, दुष्यंत सोनाळे, उमेश चव्हाण, मुन्तेजित, अ. गफार, शेरअली, अ. रशीद, फय्यूम, भानूसिंह रावत, संदीप सोनकांबळे, रमेश गोडबोले, राजू काळे, संतोष मोरे, संजय मोरे, सुनिल आडकोरे, साहेबराव धनगे, भीमराव कल्याणे, बालाजी सुर्यवंशी, लालबा पाटील शिंदे दिग्रसकर, प्रकाशकौर खालसा, पुनिता रावत, ललिता कुंभार, सुमती व्याहळकर, जयश्री जयस्वाल, अरुणा पुरी, अदिंची उपस्थिती होती.